शिवनेरी प्रतिष्ठान फाउंडेशन महागांव च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१५ सप्टें.) : रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवु नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव येथे शिवनेरी प्रतिष्ठान फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक १४ सप्टेंबरला सकाळी १० ते ३ दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरामध्ये ८५ रक्तदात्यानी आपले रक्तदान केले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील चमू रक्त संकलनासाठी येथे आले होते. या रक्तदान शिबिरात युवक, नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग घेतला होता. रक्तदात्याना यावेळी शिवनेरी प्रतिष्ठान फाउंडेशन च्या वतीने फळ व अल्प आहाराच आयोजन करुन तसेच रक्तदान केल्याच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या शिबिर आयोजनामध्ये अध्यक्ष मोहन काळसरे, उपाध्यक्ष मिलिद मुनेश्वर, सचिव मनोज नरवाडे , सहसचिव गणेश कुसुमवाड, स्वराज भरवाडे, अभिनव नरवाडे, रुपेश डाखोरे, हेमंत शिंदे, अनिकेत राउत, अनुराग कल्याणकर, शुभम भरवाडे, अतुल राऊत, अंकुश फोफसे, आकाश महामुने, अक्षय गांवडे, पवन बोईनवाड, मारोती बहीरवाड, दिनेश कुसुमवाड, सुरज गायकवाड, रोहित धरनकर, तेजस ठाकरे, पवन ठाकरे, ऋत्विक गांवडे, योगेश आढाव, अजिक्य वजिराबांदे, सोनु डाखोरे या युवकाच्या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या सिंहाचा वाटा आहे.
शिवनेरी प्रतिष्ठान फाउंडेशन महागांव च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन शिवनेरी प्रतिष्ठान फाउंडेशन महागांव च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.