चंद्रपूर शहरातील इंदिरा नगरात अनेक समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१५ सप्टें.) : मंगळवार दिनांक १४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर हनुमान टेकडी,इंदिरा नगर मुल रोड ह्या ठिकाणी वार्डातील काही समस्याबाबत नागरिकांची एक बैठक पार पडली.

बैठकीत या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्यांचा फार मोठा पाढा त्यांनी वाचून दाखविला. सदरहु बैठकीला यंग चांदा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे युवा अध्यक्ष जितेश कुळमेथे स्वता हजर हाेते. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनी या भागात प्रत्यक्ष भेट दिली व तेथील परिस्थिती स्वता आपल्या डाेळ्यांनी बघितली. 

वार्डातील सर्व समस्या तातडीने सोडविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर पूर्ण प्रयत्न करेल असा दिलासा युवा जिल्हाध्यक्ष (आ.आ) जितेश कुळमेथे यांनी या वेळी नागरिकांना दिला. संघर्ष केल्या शिवाय कुठलेही समस्या निकाली निघू शकत नाही. असे देखील ते आपल्या बाेलण्यातुन या वेळी म्हणाले.

पार पडलेल्या बैठकीला प्रामुख्याने सिद्धार्थ मेश्राम, नरेश आत्राम, रुपेश मुलकावार, वसिम कुरेशी अतुल बोडे व या वार्डातील शेकडों नागरिक उपस्थित होते.
चंद्रपूर शहरातील इंदिरा नगरात अनेक समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष चंद्रपूर शहरातील इंदिरा नगरात अनेक समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.