योगिता जामकर यांची शुटिंगबॉल इंडियन टीम मध्ये निवड


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१५ सप्टें.) : राजस्थान येथील हनुमानगढ येथे झालेल्या ३९ वी सिनियर नॅशनल शूटिंगबॉल चॅम्पियनशिप मध्ये कु.योगिता देवेंद्र जामकर हिने विदर्भ राज्याचं प्रतिनिधित्व करून विदर्भा ला ३ रा क्रमांक पटकावून दिला. तसेच तिची निवड शूटिंगबॉल च्या भारतीय संघामध्ये निवड झाली.

पांढरकवड्यातील श्री.नितीन नक्षणे हे योगिता चे कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनात व तिच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी शुटिंगबॉल मध्ये ७ नॅशनल अवॉर्ड प्राप्त केले. या बातमीने पांढरकवडा शहरात योगिताचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.
योगिता जामकर यांची शुटिंगबॉल इंडियन टीम मध्ये निवड योगिता जामकर यांची शुटिंगबॉल इंडियन टीम मध्ये निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.