टॉप बातम्या

रविंद्र टोंगे यांची भाजप मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पार्टीच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने रविंद्र सुधाकर टोंगे यांची भाजप मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

भाजप मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश देविदासजी लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात १६ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन रविंद्र टोंगे यांची शहर सरचिटणीसपदी निवड केली. या सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकराव उईके साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार मा. संजीव रेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम आणि ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे, तालुका महामंत्री प्रशांत नांदे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी टोंगे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात टोंगे यांचे स्वागत करून त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करण्याबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल रविंद्र टोंगे यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन होत आहे.

“पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटन मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार,” अशी भावना रविंद्र टोंगे यांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();