टॉप बातम्या

अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपमध्ये विविध नियुक्त्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त शेतकरी सुविधा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.


यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.प्रा.ना अशोक उईके, जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, किसान मोर्चाचे दिनकर पावडे, पवन एकरे, वणी नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, वणी तालुकाध्यक्ष प्रदीप जेजुरकर, जेष्ठ नेते मंगेश देशपांडे, माधव कोहळे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, ओबीसीचे मारोती गौरकार, रमण डोये, जेष्ठ नेत्या शोभा नक्षणे, माला गौरकार, शालिनी दारुण्डे, मनीषा बोढाले, आदींची मंचावर उपस्थिती होती.

याप्रसंगी रविंद्र टोंगे यांची भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी गणेश झाडे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय भाजपा कामगार आघाडीच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी मारोती तुराणकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दयाल रोगे यांच्यावरही भाजप ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्या.

या नियुक्त्यांमुळे मारेगाव तालुक्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, आगामी काळात पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();