सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय राहिलेले गणेश झाडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
गणेश झाडे यांनी यापूर्वी तीन टर्म भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेची धुरा सांभाळली. त्यानंतर तालुका संघटक महामंत्री तसेच भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी योगदान दिले.
पक्षाने वेळोवेळी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य याची दखल घेत आता त्यांची ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मारेगाव तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नवनियुक्त जिल्हा सचिव गणेश झाडे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.
“पक्षाने दिलेली ही नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत ओबीसी समाजासह पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार,” अशी भावना गणेश झाडे यांनी व्यक्त केली.

