सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुकाध्यक्ष मा. अविनाश देविदास लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळा उत्साह, जल्लोष आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत थाटात पार पडला. या सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी वेळात वेळ काढून प्रमुख उपस्थिती लावत अविनाश लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार मा. संजीव रेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम, ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पवन एकरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिष्टचिंतन सोहळ्यातून निवडणुकीचे रणशिंग
अविनाश लांबट यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न ठरता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक तयारीचा आणि आगामी राजकीय वाटचालीचा प्रारंभबिंदू ठरला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला.
मंत्री उईके यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यामुळे अविनाश लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकीय रणशिंग फुंकले गेल्याची चर्चा मारेगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.तत्पूर्वी यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्याबद्दल मार्गदर्शक केले, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना चार्जिंग केले.
वाढदिवसानिमित्त संघटनेत नव्या जबाबदाऱ्या
सोहळ्याचे औचित्य साधून भाजप संघटनेत विविध नियुक्त्याही करण्यात आल्या. रविंद्र टोंगे यांची भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी, तर गणेश झाडे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय दयाल रोगे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या मंडळ अध्यक्षपदी तसेच मारोती तुळशिराम तुराणकर यांची भाजपा कामगार आघाडीच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी, गोविंदा निखाडे यांच्या सह अनेकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच दयाल रोगे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अल्पावधीतच पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविल्याने या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांच्या गर्दीने सोहळा गाजला
अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यकर्त्यांनी अविनाश लांबट यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाला आणि आगामी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती गौरकार यांनी केले. सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पवन ढवस यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे,प्रसाद ढवस, चंद्रशेखर काळे, विजय खिरटकर, सुभाष खडसे, दादाराव ठोबरे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, राहुल राठोड, मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अनिकेत चोपने, गणेश झाडे, अतुल खिरटकर, प्रशांत जुमडे, नंदू खापणे यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारी मोलाची उचलली.
एकीकडे वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांची उपस्थिती आणि दुसरीकडे नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मिळालेले मार्गदर्शन यामुळे अविनाश लांबट यांचा अभिष्टचिंतन सोहळा मारेगाव भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला.