टॉप बातम्या

डॉ. रंगनाथन यांच्या विचारांना उजाळा देऊन इंदिरा महाविद्यालयात जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंबस्थानिक इंदिरा महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर तर वक्ते म्हणून डॉ. प्रशांत जवादे व डॉ. कैलाश नेमाडे हे उपस्थित होते.

डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. प्रशांत जवादे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील भरीव कार्याचे स्मरण केले. डॉ. कैलाश नेमाडे यांनी रंगनाथन यांचा ग्रंथालय क्षेत्रातील व्यापक दृष्टिकोन आणि सकारात्मक बदल याविषयी सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पवन मांडवकर यांनी ग्रंथालय क्षेत्रातील आधुनिकता आणि त्या पार्श्वभूमीवर इंदिरा महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाची प्रगती याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन कु. अर्चना भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. वैभव कठाणे यांनी केले. 
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();