टॉप बातम्या

देशभक्तीपर विद्यालयीन समूहगीत स्पर्धेत ५० शाळांचा सहभाग


सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

यवतमाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून Lions Club Yavatmal यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक महेश भवन येथे देशभक्तीपर विद्यालयीन समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे हे ४३ वे वर्ष असून, स्व. मुसाभाई लोढा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी श्री. अन्वरभाई लोढा यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

यंदाच्या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ५० शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे दिला. या मध्ये यवतमाळ पब्लिक स्कूल उबुन्टु इंग्लिश मीडियम स्कूल स्कूल ऑफ स्कॉलर वीणा देवी दर्डा स्काय इंटरनेशनल स्कूल जायंट इंग्लिश मीडियम स्कूल यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. 

स्पर्धेचे परीक्षण श्री. आनंद देवगरे, श्री. पराग महाजन, सौ. अपर्णा शेलारकर आणि कु. साक्षी काळे यांनी केले.

कार्यक्रमासाठी विभागीय प्रमुख लॉ MJF अभय गांधी आणि लॉ MJF कल्पना गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने MJF लॉ. पुष्पा पालडीवाल यांच्या सौजन्याने सहभागी विद्यार्थ्यांना सुमारे ४०० वृक्षांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण तहसीलदार डॉ. योगेश देशमुख आणि TDRF संस्थापक श्री. हरिश्चंद्र राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, सहाय्यक पोलिस अधीक्षक थोरात साहेब यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास लॉ. राजकुमार अग्रवाल, लॉ. विजय लाहोटी, लाँ. MJF पुष्पा पालडीवाल, लॉ. हुक्मीचंदजी पालडीवाल, लॉ. मनोज अग्रवाल, लॉ. माधव रुईकर आणि लॉ. डॉ. नितीन सिंगवी यांच्यासह लॉयन्स क्लब यवतमाळ चे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. सुरजीत रावत, लॉ. सुषमा रावत आणि लॉ. MJF सुनील जोशी यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर लॉ. शरद निमोदीया, लॉ. डॉ. निकिता चव्हाण, अध्यक्ष लॉ. अशोक पटेलपैक, सचिव लॉ. विवेक चमेडिया, कोषाध्यक्ष लॉ. डॉ. दीपक घरझोडे, लॉ. डॉ. सी बी. अग्रवाल, लॉ अँड अशोक भंडारी लॉ माधव रुईकर आणि लॉ. नारायण धूत यांच्यासह लॉयन्स क्लब यवतमाळ च्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजना साठी लॉ जीतेंश नवाडे दिलीप गंगमवार यशवंत डांगे राजेश डांगे मोहन शेर यांचे सहकार्य लाभले. 

देशभक्ती, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();