टॉप बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अविनाश लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पक्षाचे मारेगाव मंडळ अध्यक्ष मा. श्री. अविनाशजी लांबट यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छा संदेश देत अविनाश लांबट यांना दीर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बावनकुळे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, “वाढदिवसानिमित्त आपणांस कोटी कोटी शुभेच्छा! गतकाळातील स्मृती अन् भविष्याची रूपरेखा निश्चित करण्याचा हा दिवस. देश, जनता व पक्षकार्यासाठी आपण संकल्पसिद्ध व्हावे हीच सदिच्छा!” असे नमूद केले.
तसेच “आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो!” अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करत त्यांनी अविनाश लांबट यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या या शुभेच्छांमुळे अविनाश लांबट यांच्या कार्याची पक्षातील वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. 
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यावेळी मंडळ अध्यक्ष अविनाश लांबट मनःपूर्वक त्यांचे आभार मानले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();