सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१५ सप्टें.) : महाराष्ट्राच्या कानाेकाेप-यात प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या सहजं सुचलं महिला व्यासपीठाचे खरे श्रेय ह्या व्यासपीठाच्या मुख्य मार्ग दर्शिका तथा वैदर्भिय जेष्ठ सुपरिचित लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे व याेग गुरु शिक्षिका मायाताई काेसरे यांचे असल्याचे मत सहजं सुचलंच्या संयाेजिका सुविद्या बांबाेडे यांनी काल आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले.
सदरहु ग्रुपची संकल्पना एका २४ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची असुन या (व्हाट्स ऍप) ग्रुपची निर्मिती गेल्या ५ वर्षा पुर्वी केल्या गेली. सदरहु ग्रुप सात भागात आजच्या घडीला विस्तारला गेला असुन या व्यासपीठावरील महिला सदस्यांची संख्या शेकडाेंच्या घरात आहे. महिलांच्या कलागुणांना वाव व प्राेत्साहन देणे हा मुख्य उद्देश्य या ग्रुपचा असुन महाराष्ट्रातील अनेक कलावंत,साहित्यिक क्रीडा पटु व समाज सेविका या ग्रुपवर आहे. आरंभी या ग्रुपची सदस्या संख्या बाेटावर माेजण्या इतकी हाेती पण झपाट्याने या ग्रुपची संख्या वाढीस गेली. दरम्यान याच व्यासपीठा वरील अनेक महिला व तरुणींने विविध स्पर्धेत भाग घेवून पुरस्कार प्राप्त करीत स्वता साेबत सहजं सुचलंचे नाव राेशन केले आहे.
सामाजिक क्षेत्रात व साहित्यक्षेत्रात ग्रुपच्या सदस्यांचे योगदान माेलाचे व उल्लेखनीय असून कु.कल्याणी सराेदे, कु.सायली टाेपकर, श्रुष्टी राेकडे, प्रतीक्षा मैदपवार, श्रध्दा हिवरे यांची या वर्षातील कामगिरी चमकदार असुन मालती सेमले, अर्चना दरडे, वंदना आगलावे, प्रतिमा नंदेश्वर, वर्षा शेंडे, अर्जूमन शेख, भावना खाेब्रागडे या शिवाय भारती सावंत, भारती सानप, श्रुति उरणाकर, डॉ.स्मिता मेहेत्रे, वंदना हातगांवकर , नयना झाडे, अर्चना सुतार, उज्वला यामावार, एड.कविता माेहरकर, मनिषा मडावी, शितल पाटील, मेघा भांडारकर, कांचन मुन, विजया भांगे, शुभांगी डाेंगरवार, सिमा पाटील यांचे देखील कार्य तेव्हढेच काैतुकास्पद असल्याच्या मुलाखती दरम्यान सुविधा बांबाेडे म्हणाल्या, सध्या तरी सहजं सुचलं महिला व्यासपीठ सर्वांगीण सुंदर असेच असल्याच्या त्या शेवटी म्हणाल्या.
ग्रुप वरील उल्लेखनीय कामगिरी करणां-या सदस्यांचे अभिनंदन करण्यांस त्या या वेळी विसरल्या नाही.
सहजं सुचलं व्यासपीठाचे खरे श्रेय मेघाताई - मायाताई या जाेडीचे - सुविद्या बांबाेडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 15, 2021
Rating:
