ठाणेदार मंडलवारांनी केले सभेला मार्गदर्शन..



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (५ सप्टें ) : प्रतिबंध आदेश जारी झाल्याने उद्याचा पोळा दरवर्षी प्रमाणे साजरा करता येणार नाही. यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजा हिरमुसला. मागील वर्षी अगदी साध्यापणाने आणि तो घरीच पोळा साजरा करण्यात आला होता, याही वर्षी आता साध्या पणाने आणि घरीच साजरा करता येईल, या अनुषंगाने मार्डीमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविराज चंदनखेडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पोळा भरणार नाहीत, उद्या सोमवार व मंगळवारला असणारा तान्हा पोळाही भरणार नाही असे जाहीर करण्यात आले असून, वरील प्रमाणे दवंडीद्वारे ग्रामस्थांना कळविण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच पोळा यासह गौरी पूजन, गणपती हे उत्सव नागरिकांनी घरीच साध्यापणाने शासनाच्या परिपत्राचे अधिनस्थ राहुनच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. 

सणासुदीला गावात अनुचित प्रकार घडू शकेल! अशा कोणत्याही हालचाली कळविण्याबाबत पोलीस पाटलांनी सतर्क राहावे, अशा सुचना त्यांनी केल्या. डॉ. पाटील (पोलीस पाटील) यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला सहकार्य व सूचनांचे पालन करण्यात येईल असे यावेळी म्हणाले. 

यावेळी सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच प्रफुल्ल झाडे, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, सदस्य माणिक कांबळे, राजकुमार बोबडे, विठ्ठल मांढरे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेश देशपांडे, माजी सरपंच भास्कर धानफुले, रामकृष्ण चौधरी, माजी उपसरपंच गोविंदा मांढरे, सुरेश मुरस्कर, सुरेश नाखले ईत्यादी उपस्थित 
होते. 

ठाणेदार मंडलवारांनी केले सभेला मार्गदर्शन.. ठाणेदार मंडलवारांनी केले सभेला मार्गदर्शन.. Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.