जेसी राजुरा रॉयल्स च्या वतीने शिक्षक दिन साजरा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०५ सप्टें.) : आज ५ सप्टेंबर "शिक्षक दिन" या दिनाचे औचित्य साधून चन्द्रपुर जिल्ह्यातील जिवती, कोरपना राजुरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शानदार सन्मान सोहळा बल्लारपूर औद्योगिक नगरीतील पी.डब्लू.डि. सभागृहात थाटात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे .सी. नरेंद्रजी बारडीया यांनी विभूषित केले हाेते तर, प्रमुख पाहुणे म्हणून जे.सी.भरत बजाज उपस्थित हाेते. पार पडलेल्या या देखण्या सत्कार सोहळ्यात अतिदुर्गम जिवती, कोरपना, व राजुरातील शिक्षकांचे कर्तृत्वांचे विविध पैलू वर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमात राजुराच्या इंफॅन्ट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूलच्या शिक्षिका मेघा धोटे यांचा मानचिन्ह, प्रसशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन गाैरव करण्यात आला. शिक्षकांचे कार्य पाहून भारावून गेलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अवाक् झाले. जि.प . शिक्षकांची डागाळलेली प्रतिमा नक्कीच यामुळे सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा गाैरव साेहळा तब्बल चार तासांपर्यंत चालला. सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेसी सुषमा शुक्ला यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्रकूमार शुक्ला यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेसी स्मृती व्यवहारे, जेसी सुशीला पोरद्दीवार, जेसी जयश्री शेंडे, जेसी सुषमा शुक्ला व इतर जेसी राजुरा रॉयल्स यांनी अथक परिश्रम घेतले.  
इंफॅन्ट शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, व्यवस्थापक, मुख्याद्यापक शिक्षक वृंद, तथा मित्र परिवारांनी मेघा धाेटे यांचे अभिनदंन केले. मेघा धाेटे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या एक मुख्य मार्गदर्शिका आहे. 
जेसी राजुरा रॉयल्स च्या वतीने शिक्षक दिन साजरा जेसी राजुरा रॉयल्स च्या वतीने शिक्षक दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.