रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी गौतम गावंडे यांची निवड तर तालुका महासचिवपदी कपिल भेदेकर यांची निवड


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड, (०६ सप्टेंबर) : दिनांक ५ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह बिलोली येथे रिपब्लिकन सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने देगलूर बिलोली पोटनिवडणूक लक्षात घेऊन पक्षबांधणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी माननीय गौतम गावंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका महासचिव पदी कपिल भेदेकर, रिपब्लिकन सेनेच्या बिलोली उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गावंडे, तालुका सचिव शेषराव गावंडे ,युवा तालुका अध्यक्ष जयदीप गावंडे, रिपब्लिकन सेनेच्या बिलोली शहराध्यक्षपदी सतीश कुडके ,रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी आघाडी बिलोली तालुका अध्यक्षपदी जयपाल काळे,यांची निवड करण्यात आली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मुजीब भाई पठाण सर, प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ शिरसे, रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ गोडबोले, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सोनकांबळे, रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेमलाताई वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव अनिताताई इंगळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ सावते, रिपब्लिकन सेनेचे युवा शहराध्यक्ष मुखेड पप्पू सोनकांबळे, यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी गौतम गावंडे यांची निवड तर तालुका महासचिवपदी कपिल भेदेकर यांची निवड रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी गौतम गावंडे यांची निवड तर तालुका महासचिवपदी कपिल भेदेकर यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on September 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.