सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे
वणी, (०७ सप्टेंबर) : तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील १७ वर्षीय युवकाने वर्धा नदीच्या पत्रात पाटाळा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची उघडीस आली.
सम्यक तारक वाघमारे राजूर कॉ वार्ड नं.४ मधील तारक देविदास वाघमारे यांचा मोठा मुलगा हा शनिवारी दुपारी काकांची दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून घरून घरा बाहेर पडला. सायंकाळ पर्यंत तो परत आला नसल्याने काकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे सम्यक च्या कुटुंबीयांनी वणी पोलिस स्टेशन ला त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. असता सम्यक यांनी नेलेली दुचाकी रविवारी पाटाळा पुलाजवळ आढळून आली. भद्रावती तालुक्यातील तेलवासा येथे सकाळी काही मजुरास नदी पात्रात तरुणाचा मृत्यूदेह आढळून आला. तेलवासा येथील पोलीस पाटील यांनी भद्रावती पोलीस स्टेशन ला माहिती दिली. भद्रावती पोलिसांनी वणी पोलीस स्टेशन ला संपर्क साधून आपल्या परिसरातील कोणी बेपत्ता आहे का? अशी विचारणा केली असता त्यांनी राजूर येथील एक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगितले. या माहिती च्या आधारे वणी पोलिसांनी सम्यक च्या कुटुंबियांना माहिती दिली असता सम्यक चे कुटुंब घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूदेहाची ओळख पटली असता तो मृत्यूदेह सम्यक चा असल्याचे निष्पन्न झाले.
सम्यक ने कोणत्या कारणांनी आत्महत्या केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
राजूर येथील बेपत्ता १७ वर्षीय युवकाचा सापडला मृत्यूदेह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 07, 2021
Rating:
