सह्याद्री न्यूज | किरण घाटे
नागपूर (०७ सप्टें.) : श्रावण मास निमित्त उपराजधानी नागपूरात हनुमान शक्ती माता मंदीर नगर च्या महिलांनी श्रावण सरीचा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. सदरहु कार्यक्रमात महिलांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले हाेते. या निमित्ताने एक डॉन्स स्पर्धा पार पडली. सदरहु कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साेनाली घाेडमारे व मीनाक्षी माळवी प्रामुख्याने उपस्थित हाेत्या.
स्पर्धेत भाग घेणांऱ्या मुलींना नागपूरच्या उपमहापौर मनिषाताई धावडे, नगरसेविका स्मिता चकोले व मनिषाताई कोठे यांनी प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार केला. महिला समितीच्या कविताताई रेवतकर, चित्राताई माकडे, अंजु भटनागर या शिवाय सोना गोरडे, दीप्ती सरडे, उज्वला वाडी, अस्मिता तिवारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी विशेष परिश्रम घेतले.
नागपूरात पार पडला श्रावण सरीचा कार्यक्रम, शक्ती माता नगर महिलांचा उपक्रम !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 07, 2021
Rating:
