जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड ने उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापनाचा सलग चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून ऊर्जा व्यवस्थापनेत राष्ट्रीय लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च बहुमान पटकावला

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (०६ सप्टें.) : जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेडने कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) गोदरेज ग्रीन बिजनेस सेंटर (GBC), आयोजित 22 व्या राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमतेचा पुरस्कार प्राप्त केला आहे. सलग चौथ्यांदा पुरस्कार प्राप्त करणारी जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड ही कंपनी ठरल्याने तीला ऊर्जा व्यवस्थापनेत राष्ट्रीय लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. 27 ऑगस्ट 2021 रोजी सी आय आयने आयोजित केलेल्या वर्च्युअल ईव्हेन्ट दरम्यान पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) चे संचालक श्री. सुनील खंडारे आणि ऊर्जा परिषदेचे अध्यक्ष श्री रवींद्रन पुरुषोत्तम, (CII), डॅनफॉस इंडिया चे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या विविध औद्योगिक क्षेत्रातील संस्थानी ऊर्जा व्यवस्थापनात उत्कृष्ट नियोजन कामगिरी व ऊर्जा क्षेत्रातील उच्च तंत्र ज्ञानाचा वापर हे पुरस्कार देण्यामागे उदिष्ट आहे. सी आय आय कंपन्यांना या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी व पद्धती आणि तंत्रज्ञानाची माहिती सामायिक करण्याची अनोखी संधी सादर करीत असते. तज्ञाचा व्यापक आणि कठोर मूल्यांकनावर आधारित उत्कृष्टता आणि संधी ओळखण्यास मदत करते. यामुळे या क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपन्यांना सर्व व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि नेटवर्क ची संधी देखील निर्माण होते.
या राष्ट्रीय पुरस्कार प्रक्रियेत निवडण्याचे दोन स्तर असतात. पहिला स्तरावर प्रश्नावली सादर करणे आहे. दुसरा स्तर राष्ट्रीय निष्णान्त ज्यूरीसमोर प्रत्यक्ष केलेल्या कार्याचे सादरीकरण आहे. पहिल्या स्तरावरील कंपन्याकडून प्राप्त झालेल्या प्रश्नावलीचे न्यायाधीशांच्या तज्ञ् पॅनल द्वारे कठोर मूल्यांकन केले जाते. एकदा एखादी कंपनी सुरुवातीच्या स्क्रिनिंग प्रक्रियेत निवड झाली की तीला राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कारामध्ये सादरीकरण करावे लागतो. हा पुरस्कार सहभागी संस्थेच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी चे मोजमाप करतो आणि मजबूत निरोगी स्पर्धात्मक वातावरण आणि उत्कृष्टतेचे उच्च दर्जा राखताना उत्कृष्टतेच्या संधीच्या तपशीलावर अभिप्राय प्रदान करतो. पुरस्कार मूल्यमापन निकषात. विशिष्ट ऊर्जा वापरामध्ये सातत्याने घट. राष्ट्रीय आणि वैश्विक स्टरांच्या जवळील कामगिरी. ऊर्जा संवर्धनातील नावीन्यपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्याची प्रतिकृती क्षमता. उत्कृष्ट आणि समर्पित टीम वर्क अक्षय ऊर्जामध्ये फूट प्रिंट. कार्बन उत्सर्जन कमी. अंमलबजावणी ISO 50001 एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम स्टॅन्डर्ड, कचरा नियोजन व त्याचा वापर, पर्यावरण अनुकूल उपक्रम ऊर्जा संवर्धनावर या स्तरावर कंपनीने केलेल्या कार्याचा विचार करूनच निवड करण्यात येते.
औष्णिक ऊर्जा प्रकल्प श्रेणीतील 40 हुन अधिक कंपन्यानी या स्पर्धेत भाग घेतला. या पैकी 22 कंपन्यांना अंतिम फेरीच्या सादरीकरणासाठी निवड करण्यात आले. या 22 पैकी 4 कंपन्यांना राष्ट्रीय लीडर इन इंडस्ट्री पुरस्कार मिळाला आहे. जी एम आर वरोरा ही यापैकी एक आहे. ज्यूरी सदस्यांनी सर्वात उपयुक्त सादरीकरण म्हणून घोषित केले. उत्कृष्टतेच्या दिशेने GWEL प्रवास व कंपनी परिसरात ऊर्जा आणि स्रोत याचा अनुकूल वापर करण्याच्या दिशेने कठोर परिश्रम केले आहेत. उपरोक्त उदिष्ट साध्य करण्यासाठी जी एम आर नी ISO 50001 एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम ऑपरेशनच्या दुसऱ्या वर्षी लागू केली होती. आम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापर कमी करण्यासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. आम्ही यासाठी बेंचमार्किंग करतो. ऊर्जा संवर्धनाची प्रत्येक संधी ओळखून, अंतर्गत आणि बाह्य ऊर्जा ऑडिट, अक्षय ऊर्जेची तैनाती, सर्व भागधारकांना ऊर्जा संवर्धन जागरूकता या सर्व प्रयत्नांच्या अंमलबजावणीसह GWEL ने कडक देखरेख आणि निर्वाह सुनिश्चित करून त्याच्या ऊर्जेचा वापर मोठया प्रमाणात अनुकूल केला आहे. स्थापनेपासून GWEL ने विविध ऊर्जा कार्यक्षमता पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे GWEL गेल्या 4/5 वर्षांपासून समवयस्कामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे युनिट बनले. गेल्या 3 वर्षात GWEL ने 443 अब्ज किलोकॅलरी ऊर्जा कमी केली आहे. याचाच परिणाम म्हणून 1 लाख मेट्रिक टन कोळसा आणि 238 KI तेल याची बचत करून राष्ट्रीय खनिज संपत्ती याची बचत केली आहे. असे प्रतिपादन जी एम आर वरोरा चे प्लॅन्ट हेड श्री धनंजय देशपांडे यांनी सांगितले. या कार्यात असलेल्या आव्हानांना न जुमानता ऊर्जा संवर्धन ही संस्कृती सिद्ध करत सलग चार वेळा पुरस्कार जिंकण्याची ही विलक्षण कामगिरी फार कमी संस्थानी साध्य केली आहे. हा पुरस्कार जी एम आर सारख्या सामाजिकदृष्ट्या जबाबदार असण्याच्या समुहाच्या दृष्टीकोणाची साक्ष आहे. तसेच या सारखे पुरस्कार प्राप्त करून पर्यावरण, सामाजिक दायित्व प्रती कंपनीचे प्रयत्न प्रकट करतात. गुणवत्ता,पर्यावरण ऑपरेशनल परफॉमन्स आणि कार्यक्षमतेच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जागतिक दर्जाची उपयुक्त कंपनी बनण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही ऊर्जा कार्यक्षमतेच्या दिशेने आपले प्रयत्न चालू ठेवणार आहोत. 
जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड ने उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापनाचा सलग चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून ऊर्जा व्यवस्थापनेत राष्ट्रीय लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च बहुमान पटकावला जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड ने उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापनाचा सलग चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून ऊर्जा व्यवस्थापनेत राष्ट्रीय लीडर इन इंडस्ट्रीचा सर्वोच्च बहुमान पटकावला Reviewed by सह्याद्री चौफेर on September 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.