Top News

नेरीत पार पडला शिक्षक दिनाचा कार्यक्रम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०६ सप्टें.) : नेरी येथील स्व.दागाेजी पिसे महाविद्यालयात काल दि.५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा.नागदेवते लाभले हाेते. आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमात प्रा.कु.गाैरी नेऊलकर, प्रा.कु.पल्लवी कामडी, प्रा.रागिनी डांगे यांनी आपले मनाेगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शितल शिवरकर यांनी केले तर संचालन कु.साेनाली मेश्राम यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाला प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी उपस्थित हाेते. .
Previous Post Next Post