टॉप बातम्या

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई; जनावरांची तस्करी उधळली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कोंधारा फाट्याजवळ पोलिसांनी संशयित ट्रक अडवून जनावरांच्या तस्करीचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत ट्रकमधून तब्बल ३७ जनावरांची सुटका करण्यात आली असून, तीन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कोंधारा फाट्याजवळ पोलिसांनी संशयित ट्रक अडवून त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या संख्येने जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ३७ जनावरांची सुटका केली.

ही जनावरे तेलंगणामध्ये कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित तस्करांना ताब्यात घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पांढरकवडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जनावरांची होणारी तस्करी रोखण्यात यश आले. महामार्गावर पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणीमुळे तस्करांवर वचक निर्माण झाला असून, या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

कायद्याची कडक अंमलबजावणी आणि निरपराध जनावरांच्या संरक्षणासाठी पांढरकवडा पोलिसांची कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();