टॉप बातम्या

आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा "रास्ता रोको"


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२५ सप्टें.) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धानोरा -भोयेगाव, गडचांदुर- जिवती रस्त्याचे काम सुरू झाले मात्र, गडचांदुर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतच्या रस्त्याचे काम एकतर्फी रस्ता खोदून एक वर्षापासून अत्यंत संथ गतीने करण्यात येत आहे. तसेच या मार्गाने माणिकगड सिमेंट कंपनीची जड वाहने या रस्त्याने ये जा करत असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे असे न झाल्यास प्रहार रस्ता राेकाे आंदोलन करेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका प्रमुख सतीश बिडकर यांनी एका निवेदनातून दिला आहे.

सदरहु रस्त्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते अशातच एक तर्फी रस्त्याचे बांधकाम होऊन त्याचे अर्धवट काम झाले असल्याने आतापर्यंत अनेक अपघात होऊन त्यात अनेक जीव सुद्धा गेले आहे, अनेक नागरिक गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करावी व तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे. एक तर्फी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सपाट करण्यात यावा ही कामे तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यांत येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सतिश बिडकर, पंकज माणूसमारे, सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, अरविंद वाघमारे, महादेव बिस्वास, अनुप राखुंडे सूरज बार, नितेश कोडापे, व अन्य कार्यकर्त्यांनी एका निवेदनातून संबधित विभागास दिला आहे.
Previous Post Next Post