पांढरकवडा शहरात शासकीय सेवेत असणारे शिक्षकांद्वारे शिक्षणाचा भ्रष्टाचार ?


                          (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२५ सप्टें.) : पांढरकवडा येथील शासकीय अधिकाऱ्यांना मागील चार ते पाच वर्षापासून अवैधरित्या खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांबद्दल तक्रारी व निवेदने दिलेत परंतु अद्याप त्या शिक्षकांवर कार्यवाही झालेली नाही.

पांढरकवडा येथील शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कार्यरत असणारे वेतन धारी शिक्षक फार मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या खाजगी वर्ग घेत आहेत त्यासंदर्भात तक्रारी व निवेदने गेल्या चार ते पाच वर्षापासून सादर केले आहेत, परंतु संबंधित अधिकारी अशा भ्रष्ट शासनाचे वेतन घेणारे शिक्षकांवर अध्याप कार्यवाही केलेली नाही.

हा सर्व प्रकार स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना जसे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहे, परंतु अजूनही कोणतीही कार्यवाही संबंधित शिक्षकांवर प्रत्यक्ष झाली नाही तर याउलट संबंधित शिक्षक दार बंद करून व लपून शिकवणी वर्ग घेत आहे. त्यांच्यावर तक्रार झाली आहे याबद्दलची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांना पुरवली जाते व त्यांना सावध करतात.


 _तर प्रश्न असा आहे की अशा भ्रष्ट शिक्षकांवर संस्थाचालकांवर किंवा संबंधित अधिकाऱ्यावर कोण कार्यवाही करेल?_ असा प्रश्न समस्त जनतेवर पडला.
पांढरकवडा शहरात शासकीय सेवेत असणारे शिक्षकांद्वारे शिक्षणाचा भ्रष्टाचार ? पांढरकवडा शहरात शासकीय सेवेत असणारे शिक्षकांद्वारे शिक्षणाचा भ्रष्टाचार ? Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.