सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२५ सप्टें.) : नुकतेच आयपीएल क्रिकेट सामन्यांचे दुसरे सत्र सुरु झाले असून क्रिकेटवर सट्टा खेळणारे व खेळवणारे सज्ज झाले आहेत. आयपीएल च्या या दुसऱ्या हंगामात शहरात क्रिकेट बेटिंगवर जुगार खेळवला जाणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असतांनाच पोलिसांना गुरुनगर येथील एका घरात क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २४ सप्टेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी धाड टाकली असता दोन इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोबाईलद्वारे सट्टा घेतांना आढळून आले. त्यातील एक इसम संधी साधून पळून गेला तर एकाला पोलिसांनी जागीच अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी ७६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आयपीएल क्रिकेट सामने सुरु होताच क्रिकेट बेटिंगवर सट्टा खेळविणारे सज्ज झाले आहेत. क्रिकेटचा सट्टा चालविणारे बुकी कुणालाही शंका येणार नाही, असे ठिकाण निवडून आपल्या कंपूतील लोकांकडून तेथे क्रिकेट बेटिंगवर सट्टा खेळवतात. क्रिकेट बेटिंगवर सट्टा लावणारे मोबाईलद्वारे या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावतात. २४ सप्टेंबरला रॉयल चॅलेंज बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग या संघादरम्यान सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर गुरुनगर येथील एका घरात मोबाईलद्वारे सट्टा खेळला व खेळवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच त्याठिकाणी धाड टाकली. घरात दोन इसम क्रिकेट बेटिंगवर मोबाईलद्वारे सट्टा घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी क्रिकेट बेटिंगवर सट्टा घेणाऱ्या इरशाद खान उर्फ आय खान इशरत खान (३६) रा. वणी याला रंगेहाथ अटक केली. तर दुसरा आरोपी अरविंद उर्फ बाप्या मडावी (३०) रा. वणी हा संधी साधून पळाला. या दोघांवरही पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी तिन मोबाईल, लॅपटॉप व इतर जुगार खेळण्याचे साहित्य तसेच रोख १३५० रुपये असा एकूण ७६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे पोउपनि आनंदराव पिंगळे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्रकुमार भरती, पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, वसीम शेख, यांनी केली.
आयपीएल क्रिकेट सट्टा घेणाऱ्या एकाला अटक, तर दुसऱ्याने ठोकली धूम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 25, 2021
Rating:
