पांढरकवडा शहरात चोराचा धुमाकूळ


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२५ सप्टें.) : पांढरकवडा तीनच दिवसापूर्वी येथील मांगुर्डा रोडवरील कुंदन नगर येथील पलाश बिश्वास हे दवाखान्याच्या कामाकरीता चंद्रपूरला गेला असता तो गावावरुन परत आला तर त्याचे घरी घरफोडी होवून चोरट्यांनी सोन्याच्या दागिण्यासह नगदी ५० हजार रुपये असा तीन लाचाखा मुद्देमाल लंपास केला होता. तसाच प्रकार आज गुरूवारी सायंकाळी ६ वाजता पुन्हा पांढरकवड्यात आढळून आला. येथील सुयोग कॉलनीतील रहिवासी जि.प. शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश गणपतराव ठाकरे हे दि १९ सप्टेंबर रोजी परिवारासह यवतमाळ येथील दवाखान्याच्या कामाकरीता गेले होते.

आज ते दि . २३ सप्टेंबर रोजी सायं ६.वाजता पांढरकवड्याला परंत आले असता त्यांच्या घरातील आलमारीतील कपडे अस्ताव्यस्त फेकून दिसले तर आलमारीत ठेवलेले नगदी ५० हजार रुपये व पंधरा हजाराचे सोन्याचे दागिणे असे ६५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळले. ही चोरी चोरट्यांनी घराच्या भिंतीवील लोखंडी ग्रिल तोडून आत प्रवेश करुन केल्याचे आढळले.

पोलीसांनी यवतमाळ वरुन स्वान पथक व फिंगर प्रिंट युनिटला पाचारण केले चोरट्यांनी आता शहरात बाहेरगावी गेलेल्या लोकांच्या घराला निशाना बनविण्याचे टार्गेट बनविल्याचे दिसते. पांढरकवढा पोलीसांपुढे आता चोरट्यांनी प्रचंड मोठे आव्हान उभे केले असून एका पाठोपाठ २ घरफोडी पांढरकवड्यात झाल्यामुळे लोकात चोरट्याबद्दल भितीचे वातावरण पसरले आहे.

पुढील तपास स.पो.नि. संदीप बारींगे करित आहे.
पांढरकवडा शहरात चोराचा धुमाकूळ पांढरकवडा शहरात चोराचा धुमाकूळ Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.