सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (१० सप्टें.) : कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश उपेंद्र गुडेवार व कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी आदित्य सुनील मंचलवार यांनी पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चालबर्डी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.जी आर पडलवार यांच्या मार्गदर्शनात जनावरांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना जनावराच्या घटसर्प, लंपी इत्यादी विविध रोगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर ए ठाकरे सर उपप्राचार्य एम व्ही कडू सर आणि प्राध्यापिका एस पी लोखंडे मॅम यांचे मार्गदर्शन लाभले.
चालबर्डी येथे कृषी विद्यार्थ्यांनी राबवली लसीकरण मोहीम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
