काळा बाजारात जाणारा तांदुळ पकडला


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (१० सप्टें.) : काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने एका महिंद्रा गाडीत रात्रीच्या वेळी ८ क्विंटल तांदुळ घेऊन जाणार्या वाहनासह दोन आरोपींंना पोलीस व महसूल विभागाने पकडले आहे . 

 महागाव तालुक्यात अवैध रित्या शासकीय धान्याची तस्करी होत असल्याची गोपणीय माहिती महसूल विभाग व पोलीस विभागाला होती .परंतु आरोपी अत्यत

शिताफीने आज पर्यत निसटुन जात होते. ८ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या दरम्यान, इजनी वरून अवैधरित्या तांदुळ हिवरा मार्ग येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला व महसूल विभागाला होती त्यावरून पोलीस विभागाने चौकशी केली असता महिद्रा गाडी क्रमांक एम.एच 29 आय. 0795 या वाहनातून ८ क्विंटल तांदुळ आढळून आला. अंदाजे किमंत ३० हजार रूपये, पोलीसांनी चौकशी केली असता आरोपी चालक रमजान आलम आलमवाले ४० वर्ष तसेच सलीम हिरा नुरअली ४० राहणार दोघेही दिग्रस यांच्या कडे गाडी तथा धान्या संदर्भात कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही. तर हा तांदुळ आम्ही शिधापत्रीका धारकाकडुन विकत घेतला असल्याचे सागीतले आहे. त्यांचे उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी गाडी सह धान्य पोलीसांनी जप्त केले. या प्रकरणी तहसीलदार राणे यांच्या आदेशावरून पुरवठा निरिक्षक व्ही.एन. रावलोड, टि. जी. आरसुळे तसेच दिनेश आडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संबधी दोन्ही आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
Previous Post Next Post