सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१० सप्टें.) : अनेकांना वाटतंय की, आपल्या मोबाईलचा तर प्रॉब्लेम नाही ना? मात्र, असे काही नसून मागील काही दिवसांपासून मच्छिन्द्रा परिसरातील मोबाईल नेटवर्क स्वतः कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जात आहे आणि ग्राहकांना ही कव्हरेज च्या बाहेर ठेवत आहे. ऐन ऑनलाईन क्लास च्या वेळेतच नेटवर्क गायब होत असल्याने ऑनलाईन शिक्षणात गॅप तर पडत आहेच परंतु इतर ही मोबाईलवरील कामं खंड पडत असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास डोक्याच्यावरून जात आहे.
मच्छिन्द्रा येथे जियो चे टॉवर अगदी गावाला लागून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे गावासह आजूबाजूच्या परिसराला चांगला नेटवर्क मिळाला खरं. परंतु गेल्या काही दिवसापासून येथील नेट कव्हरेज गायब राहत आहे. ऑनलाईन क्लास, नेट संबंधित वर्क, अर्जंट बोलणं वैगरे यामुळे राहून जातेय. विशेष उल्लेखनीय की, ऑनलाईन शिक्षण ठप्प पडत असून, विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांत्रिक दृष्टया बघितले तर सुरुवातीला येथे नेटवर्क चांगले मिळत होते, माणूस नेटवर्क च्या बाहेर जाईल पण जियो कधी नेटवर्क च्या बाहेर जात नव्हता. परंतु आता काही दिवसापासून येथील "नेटवर्क" च्या बाहेर त्याला जाण्याची वेळ येतेय हे आश्चर्य म्हणून लोकं मोबाईल कडे नुसतं पाहत बसाव लागतं. अशी ही चर्चा आहे की, येथे एक्स्ट्रा पावर जनरेटर उपलब्ध नसल्याने तर नेटवर्क गायब होत नसेल ना, असा कयास नागरिकांकडून केला जात आहे. कारण या परिसरातील मोबाईल नेटवर्क आणि लाईट कधी जाईल येईल याचा नेम नाही. त्या मुळे जियो नेटवर्क गायब होत असेल अशी येथील ग्राहकांसह विद्यार्थ्यांत ओरड आहे. त्यामुळे जियो ला जिवंत ठेवायचे असेल पावर जनरेटर उपलब्ध असणे गरजेचे आहे. असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मच्छिन्द्रा येथील मोबाईल नेटवर्क व लाईट एकाच माळ्याचे मणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
