सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०९ सप्टें.) : तालुक्यातील सावर्ला येथील 18 वर्षीय तरूण घरुन बेपत्ता झल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अजय अनिल तामगाडगे असे या तरुणाचे नाव आहे. सदर तरूण हा 7 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता घरुन बाहेर पडला तो घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने मुलगा घरुन बेपत्ता झल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. तरुणाची आई सुमन अनिल तामगाडगे यांनी 8 सप्टेंबरला दुपारी 3.15 वाजता पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत तरुणाचा शोध घेणे सुरु केले आहे. शुल्लक कारणांवरुन मुले घरुन बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. राजूर (कॉ) येथील अशाच एका घरुन बेपत्ता झालेल्या तरुणाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच सावर्ला येथील तरूण घरुन बेपत्ता झाल्याने काळजी व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास पोलिस करित आहे
सावर्ला येथील तरूण मागील दोन दिवसांपासुन घरुन बेपत्ता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 09, 2021
Rating:
