सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (१० सप्टें.) : इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे "पोषण आहार सप्ताह" निमित्य जाजू हाॅस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात काही कुपोषित बालके आढळून आली. डॉ. रमेश जाजू यांनी मुलांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप केले.
कुपोषित बालकांना रोज पोष्टीक आहार देण्यात येत आहे व त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच रोज दोन वंचित घटकांतील मुलांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात येत आहेत. इनरव्हिल क्लब ने वर्षभर हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
या उपक्रमासाठी डॉ जाजू, श्री. विशाल जाजू, इनरव्हिल क्लब च्या अध्यक्षा सौ. मधू जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, कविता बाहेती, दिपाली बावने, प्राजक्ता कोहळे, मानसी चिकनकर, दिपाली टिपले, हर्षदा कोहळे, सारिका बावने व अन्य सदस्यांनी वर्षभर आपले योगदान देणाचे आश्वासन दिले.
इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा घेणार वंचित घटकांतील मुलांच्या आरोग्याची काळजी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
