सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (११ सप्टें.) : तालुक्यातील सगनापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन बालकाने गावातीलच एका विधवा महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवार दि. ११ सप्टें. ला सकाळी ८:३० वाजता दरम्यान घडली असून, पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठून विधीसंघर्ष बालकाविरोधात तक्रार देण्यात आली.
सविस्तर असे की, विधवा महिला ही घरचे काम आटपुन आपल्या शेतात जात होती, आपल्याला ऐकटी पाहून कोणी तरी पाठलग करीत असल्याचे पीडित विधवेला लक्षात येताच तीने अल्पवयीन बालकाला माझा पाठलाग करू नको असे सांगितले तरी, त्याने तीचा पाठलाग करून पिडीतेला मागून पकडून छेडछाड करून महिलेचा विनयभंग करण्यात आला. असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
भेदारलेल्या महिलेने अल्पवयीनच्या तावडीतून कशीबशी सुटका करून आरडाओरडा करीत घर गाठले. व कुटुंबातील सासू, सासऱ्यांना या घटनेची सर्व आपबीती सांगितली आणि मारेगाव पोलिस स्टेशन गाठून त्या अल्पवयीन विरुद्ध तक्रार दिली. विधी संघर्ष बालका विरुद्ध कलम ३५४,३५४(ड) भादवी, सह कलम ३(१)(w)(ii) गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
विधवा महिलेचा केला विनयभंग, अल्पवयीन विरोधात तक्रार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
