बु.भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त महारक्तदान शिबीर संपन्न


मुदखेड, (११ सप्टें.) : मुदखेड येथील सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी मुदखेड, वसंतराव नाईक अध्यापक विद्यालय,( डी एड ) कॉलेज तसेच मिलिंद हायस्कूल चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बु.भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी महा रक्तदान शिबीर व ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आले. या या रक्तदान शिबीराला न.प. गटनेते माधव कदम नगरसेवक लक्ष्मण् देवदे, बंदे अली खॉन पठान, कैलास गोडसे, करीम खासाब, बाबासाहेब चौदंते, बबलू शेठ भाजपा अध्यक्ष मुन्ना चांडक, शिवानंद देवके जेष्ट पत्रकार मनोट कमटे, संजय कोलते, ईश्वर पिननलवार, शेख जब्बार, शमशोदीन, मुहमद्द रज्जाक, शिवाजी एडके, युवक कॉग्रेसचे कार्यकर्ते मुजीब अहेमद केशव कोरेबैनवाड गजानन कमळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे मागदर्शक जयप्रकाश भाऊ चौदंते, कपिल चौदंते, दादाराव चौदंते हे होते तर आयोजन विलास कांबळे, राहुलकुमार कांबळे, धम्मा कांबळे, बंटी कांबळे, मुन्ना कांबळे, स्पनील कांबळे, मुकेश कांबळे, कुणाल चौदंते, आमन चौदंते, धनजंय चौदंते, नितीन चौदंते, निखील चौदंते, गौतम क्षीरसागर, शिलवंत डोंगरे, आकाश चौदंते, साई गायकवाड, किशोर मांडे यांनी केले. या महारक्तदान शिबीरात जीवन आधार ब्लड बँक याच्या पूर्ण स्टॉपने व्यवस्थितपणे कोणालाही इजा न होता उर्त्कष्ट पणे काम केले.
बु.भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त महारक्तदान शिबीर संपन्न बु.भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त महारक्तदान शिबीर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on September 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.