Top News

वारा कवठा वांजरी जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पाण्याखाली, काही काळ वाहतूक ठप्प

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (११ सप्टें.) : पाटण (बोरी) पासून दोन किलोमीटर अंतरावर खूनी नदीपात्रातील कवठा व वांजरी पांढरकवडाकडे जाणारा रस्त्यावरील पूल पाण्याखाली आला. त्यामुळे या मार्गाने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

यावर्षीचा प्रथमच एवठा मोठा पूर आल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. तालुक्यात सतत कोसळधार पाऊस पडत असल्याने हा पूर आल्याचे म्हटलं जातेय. दरम्यान, काही वेळासाठी हा रस्ता बंद होता. यंदा पहिलाच मोठा पूर आल्याने सगळी वाहतूक ठप्प झाली असून, सकाळ च्या शाळकरी शिक्षक वृंदाना पुरामुळे अडकून राहावं लागलं.

कवठा वांजरी हाडोळी गोपालपूर या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशी व शेतकरी, कर्मचारी यांचा रस्ता पाण्याने अडवून काही काळासाठी बंद होता. अशावेळी नागरिकांनी पूल ओलांडू नये व सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाकडून सांगितले. 

आज बापाला दीड दिवसाच्या विसर्जन निरोपाच्या तयारीसाठी पाटणबोरी मार्केटला नागरिकांना बाजार पेठेसाठी या रस्त्याने यावे लागते, परंतु खूनी नदीला पूर असल्याने आज सकाळ पासूनच काही वेळासाठी हा रस्ता बंद असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती.
Previous Post Next Post