सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (११ सप्टें.) : वणीत आज शनिवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून, वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष बळकटीला सुरुवात झाल्याचे असे एकंदरीत वातावरण दिसून येतेय. शिवसेना पक्ष बळकट करणे, पक्षाची बांधणी करणे, संघटन बांधणी या करिता युवकांचा पुढाकार असावा या भावनेने शिवसेनेचे नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज १५ युवकांनी शिवसेनामध्ये प्रवेश घेतला. हा पक्ष प्रवेश सोहळा देरकर यांच्या निवास्थानी पार पडला असून, शिवसैनिकात उत्सहाचे वातावरण आहे.
पक्षप्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. युवकांचा शिवसेना पक्ष पसंतीचा पक्ष ठरत आहे. शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली, दीपक कोकास, राजू तुराणकर वणी शहरप्रमुख, अविनाश भूजबराव कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सुशील मुथा प्रतिष्ठित व्यापारी, प्रशांत पाचभाई, मंगल भोंगळे शिवसेना विभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थित अरविंद तुराणकर, गणेश तुराणकर, नंदकिशोर मंगाम, सुमित सुतसोनकर, विक्रांत अलोने, सुरेश मत्ते, सचिन बोबडे, वरारकर यांनी शिवबंधन बांधून रीतसर शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी मोठया संख्येने युवक उपस्थित होते.
असंख्य युवकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश, वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष बळकटीला सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
