साकीनाका घटनेतील नराधमांना फाशी द्या : जिल्ह्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड, (१२ सप्टें.) : साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करुन तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फसणारी घटना आहे. या प्रकरणी दोषीं आरोपीवर कठोरात कठोर फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समितीच्या नांदेड जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.

मुंबई अंधेरीतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजवाडी रुग्णालयात दाखल केल्या नंतर शनिवारी तीचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. त्यानंतर  सह्याद्री न्यूज ला बोलतांना लोहराळकर यांनी जलद गती ने न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

महाविकास आघाडी सरकार च्या राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचार रोखावेत. आणि पीडित मृत महिलेच्या परिवारांना राज्य शासनाने सांत्वनपर १० लाखाची मदत करावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
साकीनाका घटनेतील नराधमांना फाशी द्या : जिल्ह्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर साकीनाका घटनेतील नराधमांना फाशी द्या : जिल्ह्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.