ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा स्वाभिमानी संघटनेचे तीव्र आंदोलनाचा इशारा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२३ सप्टें.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतले आहे मागील तीन वर्षापासून सतत नापिकी व अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे, शेतकऱ्यांपुढे जगण्याचे पेच निर्माण झाले आहे.
महागाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देवून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे, खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करताना त्यांना रीतसर पावती देण्यात यावी, व्यापार्‍यांचे वजन मापे संबंधित विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सिझनमध्ये चार ते पाच वेळा वजन काटे तपासणी करण्यात यावी ,शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हरभऱ्याचे बियाणे विना अट विनाशर्त देण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तहसीलदारांना देण्यात आले आहे सदर निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सह्या केलेल्या आहे .
प्रमोद अडकिने (तालुका अध्यक्ष युवा) दीपक हाडोळे (ता उपाध्यक्ष युवा )सचिन उबाळे (ता सचिव युवा) रामु मोरे, सचिन शेळके, रमेश राठोड, रामचंद्र चव्हाण, राजू पवार, अमोल राठोड, सुखदेव शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.

सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून हे नुकसान कधीही न भरणारे आहेत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे ,शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी नाईलाजास्तव जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल .
शिवानंद राठोड युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यवतमाळ
ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा स्वाभिमानी संघटनेचे तीव्र आंदोलनाचा इशारा ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा स्वाभिमानी संघटनेचे तीव्र आंदोलनाचा इशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.