स्व. वैष्णीव उर्फ वनश्रीच्या निवासस्थानी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकरसह इत्तरांच्या भेटी !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३ सप्टें.) : बाबूपेठ परिसरातील एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेल्या स्व.वैष्णीव उर्फ वनश्री आंबटकर यांचे निवासस्थानी चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर यांचे सह अनेकांनी नुकत्याच भेटी देवून त्यांचे परिवारांचे सांत्वन केले.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक आठवड्यानंतर आंबटकर कुटुुंबियाची भेट घेतली. त्यावेळी त्यांचे परिवारातील एका व्यक्तीला राेजगार देण्यांचे प्रशासनाला निर्देश दिले असल्याचे वृत्त आहे.
चाकु हल्ल्यात म्रूत्यूमुखी पडलेली १७ वर्षीय वैष्णीव येथील एका खासगी रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करीत हाेती.आंबटकर कुटुंबियाची आर्थीक परिस्थिती अत्यंत बिकट असुन तिचे वडील आटोचा व्यवसाय करतात तर, आई एका बचत गटाचे काम करीत असल्याचे समजते.
स्व. वैष्णीव उर्फ वनश्रीच्या निवासस्थानी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकरसह इत्तरांच्या भेटी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2021
Rating:
