टॉप बातम्या

पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२३ सप्टें.) : तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसाने हातात येणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येणाऱ्या काही दिवसातच सोयाबीन पिकाच्या सांगवणीला तर कापूस पिकाच्या वेचणीला सुरुवात होणार होती. पण संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्याखाली येवून संपूर्ण पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

दरवेळी बोंडअळी, लाल्या या रोगाने कापसाचे उत्पन्न घटले आहे. तर टोबण्या पेरण्याचे बियाणे बोगस असल्याने आणि कंपन्यांनी खताच्या भाव वाढवल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा पुन्हा डोंगर वाढत चालला आहे.
यातच सतत च्या पावसाने शेतकऱ्याला पुन्हा नेस्तनाबूत केले आहे. 
तर नदी काठावरिल पिके पुराच्या पाण्याने पार उखरून नेली आहे,त्यामुळे हातात येणारे पीक डोळ्यादेखत वाहून जात असल्याने शेतकरी पुरता खचला आहे. 
Previous Post Next Post