सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (१८ सप्टें.) : झरी जामणी मधील शासकीय कार्यलयात काम करणारे जास्तीत जात कर्मचारी अपडाऊन करतात. यामध्ये विशेतः वणी, पांढरकडा यवतमाळ, या ठिकाणाहून कर्मचारी येजा करतात. कार्यालयीन वेळेत उशीरा येणे, व लवकर निघून जात असल्याच अनुभव कार्यालयीन कामाकरिता आलेल्या जनतेला येतो आहे. अधिकारी दौऱ्याची निमित्य करून निघून जातात, ते गेले की कर्मचारी घरची वाट धरतात. शुक्रवार दि.१७ सप्टेंबर ला ३:०० वाजता अर्धे अधिक कर्मचारी हजर नसून बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या चित्र पहायला मिळतेय.
राज्य सरकारने ५ दिवसाचा आठवडा केला व कार्यालयीन कामकाची वेळ वाढविली. ती १० ते ६ वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, झरीत कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याने ४ वा. औपचारिक सुटी झाल्याचे पाहायला मिळते आहे. कामासाठी आलेल्या जनतेला एका कामासाठी चार वेळा चकारा माराव्या लागत असून, वेळ व पैसा खर्च करून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कार्यालयीन कामासाठी आलेल्या माहिला गेल्या परत..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2021
Rating:
