सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण यांचे महागांव येथे जल्लोषात स्वागत


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१८ सप्टें.) : उमरखेड येथे अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिका लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्या निमित्ताने अशोकराव चव्हाण हे उपस्थित म्हणून उमरखेड येथे येत असतांना महागांव येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तातु देशमुख, आमदार वझाहत मिर्झा, आमदार अमरनाथजी राजूरकर, माजी आमदार विजय खडसे, शैलेश कोपरकर, महेंद्र कावळे, आरिफ सुरैया, भगवान पंडागळे, अंकुश कावळे, मनोज केदार, दत्ता इंगळे, सुनिल भरवाडे, अतुल शिंदे, सुभाष नरवाडे, महेबुब खान पठाण, शे सत्तार शे जमाल अशा अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आगमना प्रसंगी काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांची व शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. अशोकराव चव्हाण यांच्या महागांव शहरात आगमनाने शासकीय यंत्रणा झपाट्याने कामाला लागली होती. हे मात्र खरे..
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण यांचे महागांव येथे जल्लोषात स्वागत सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण यांचे महागांव येथे जल्लोषात स्वागत   Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.