सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मोरगाव (१८ सप्टें.) : १३ वर्षीय बालिका गाव शेजारी असलेल्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी पिसाळलेला कुत्रा चावला, कुत्र्याने १३ वर्षीय बालिकेचा जीव घेतला. तिच्या मृत्यूमुळे अख्ख्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कल्याणी शालिक आत्राम (१३) असं मृत मुलीचं नाव आहे. ती मारेगाव तालुक्यातील जळका (पोड) येथील रहिवासी. तसेच स्व. लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात सातवीमध्ये शिक्षण घेत होती. गेल्या १० सप्टेंबरला ती गावाच्या शेजारी असलेल्या नाल्यावर कपडे धुवायला गेली असता, पिसाळलेल्या कुत्र्याने तिला चावा घेतला. परिसरातील नागरिकांनी तिच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला सुट्टी देण्यात आली.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तिची प्रकृती चांगलीच होती. परंतु आज अचानक तिची प्रकृती खालावल्याने तीला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या नशिबी उपचारही नव्हते. उपचारासाठी घेऊन जात असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
कुत्रा चावल्यानं १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2021
Rating:
