धनंजय आसुटकर यांनां मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई,तर्फे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर....


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१८ सप्टें.) : राज्यस्तरावर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ही दरवर्षीप्रमाणे समाजात विशिष्ट काम करणारया व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्याचे काम करते. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्ती, कृषिसेवा, शेती विकास, कामगार उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालांन, राजकारण, वैद्यकीय, वकिली, अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रात गुणी जनांसाठी पुरस्कार प्रदान करते. सध्या यवतमाळ जिल्ह्यातुन राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार हा सामाजिक कार्य करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बामरडा येथील धनंजय आसुटकर यांना जाहीर झाला असुन, यांनी अकादमीला गेल्या सहा महिन्यांपूर्वी आपल्या कामाचा प्रस्ताव सादर केला होता.त्यांना कोविड परिस्थिती असल्यामुळे २८ नोव्हेंबर ला ते पुरस्कार मिळणार आहे.

आता धंनजय आसुटकर हे सध्या बामर्डा गावच्या पुलाच्या प्रश्नावर राज्यमानवधिकार आयोगाकडे केलेली तक्रार, विधवा महिलांनी आर्थिक सहाय्य मिळावं, गावातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे, कोरोना काळात गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा वाचनालयासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यात दखल घेत सामान्यांचा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. सोबतच त्यांनी एम.एससी वनस्पतीशास्त्र शिक्षण पूर्ण केलं असून ते सध्या एलएलबी कायद्याचं शिक्षण घेत आहेत.


धनंजय आसुटकर यांनां मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई,तर्फे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर.... धनंजय आसुटकर यांनां मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई,तर्फे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर.... Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.