चंद्रपूरचे भूतपूर्व खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली " ईरई नदी बचाओ "आंदोलन


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१८ सप्टें.) : चंद्रपूरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भूतपूर्व खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि.१८ सप्टेंबरला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने "ईरई नदी बचाव" आंदोलन पार पडले या वेळी काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया प्रामुख्याने उपस्थित हाेते. सदरहु आंदाेलन ईरई नदीच्या पात्रात व पूलावर करण्यात आले. उपरोक्त पार पडलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्या या प्रमाणे हाेत्या : 
१) ईरई नदीवर बंधारा बांधण्यात यावा, जेणेकरून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढेल व चंद्रपूर शहराला अधिक व भरपर प्रमाणात पीण्याचे पाणी उपलब्ध करून देता येईल.
२) ईरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे.
३) ईरई नदीवर उड्डाणपूल झाल्यानंतर नदी पात्रातील मातीचे ढिगारे व पूर्वीच्या जून्या पूलाचे अवशेष हटवून नदी स्वच्छ करण्यात यावी.
४) उड्डाण पूलाचे बांधकाम सुरू असतांना नदी पात्रात निर्माण झालेले मातीचे ढिगारे आज नदीला स्थायी स्वरूपात उथळ करून प्रवाह बाधित करीत आहेत. त्या ढिगा-यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगले वाढून नदीचा प्रवाह बाधित झाला आहे व नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी पात्रातील सर्व ढिगारे हटवून नदीचे खोलीकरण करण्यात यावे.
५) नदीच्या तीरावरील परीसरात श्री गणेश विसर्जन, गौरी पूजन, छट पूजा व इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी ओटे (प्लॅटफार्म) तयार करून त्याला लागून घाट व पाय-या बांधण्यात याव्यात. याच परीसरात चौपाटी सारखे विकास करून सौंदर्यीकरण करण्यात यावे.
वरील मागण्यातील सर्व कामे जिल्हयाच्या खनिज विकास निधीतून तयार करण्यात यावी. या बाबत असे पत्र (निवेदन) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात आले असुन आंदोलन स्थळी" ईरई नदी बचाव, " ईरई नदीचे खोलीकरण"करा, "ईरई नदीवर बंधारा झालाच पाहीजे"असे नारे देण्यांत आले. 

आंदाेलनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामिण अध्यक्ष गजाननराव गावंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करणबाबू पुगलिया, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापूरे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, NSUI चे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे, कामगार नेते वसंत मांढरे, विरेंद्र आर्य, रामदास वाग्दरकर, अजय मानवटकर, काँग्रेसचे रतन शिलावार, अजय महाडोळे, प्रतिक तिवारी, बाबूलाल करुणाकर, क्रिष्णा यादव, पृथ्वी जंगम यांचे सह शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रपूरचे भूतपूर्व खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली " ईरई नदी बचाओ "आंदोलन चंद्रपूरचे भूतपूर्व खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली " ईरई नदी बचाओ "आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.