सरपंच संघटने च्या अध्यक्षपदी सरपंच अमोल शाहाणू चिकणे तर उपाध्यक्षपदी सरपंच सौ जयश्री सुनील राठोड यांची निवड
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१८ सप्टें.) : महागाव तालुका नवनिर्वाचित सरपंच संघटनेची नव्याने स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी तालुक्यातील टेंभी येथील नवनिर्वाचित युवा सरपंच अमोल शाहाणू चिकणे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी तिवरंग येथील सरपंच सौ जयश्री सुनील राठोड यांची निवड करण्यात आली आहे.आज महागाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तालुक्यातील सरपंच संघटनेच्या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील ७६ सरपंचांनी हजेरी लावली होती संघटनेचे ध्येय धोरण व संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत विकासात्मक कामादरम्यान विचारांची देवाण-घेवाण होणे व शासनावर होणारा संघटनेचा प्रभाव यावर सूचक म्हणून पंधरा वर्षाचा अनुभव असलेले सरपंच आयोजक नरेंद्र जाधव वनोली यांनी प्रकाश टाकला. गवळी अनुमोदक बापू साहेब देशमुख सरपंच सवना यांनी दिले.
यावेळी अध्यक्ष अमोल चिकणे टेंभी, उपाध्यक्ष सौ जयश्री राठोड तिवरंग, सचिव अश्वजीत भगत वाकान, कोषाध्यक्ष विकास जाधव धार मोहा, सरचिटणीस श्रीधर भगवान कर कलगाव, प्रसिद्धीप्रमुख गुणवंत राठोड यांची निवड तर सदस्य पदी दिनेश रावते पोंडुळ, बापूसाहेब देशमुख सवना, दिलीप शिंदे लेवा, अविनाश पवार बोरी, वैभव बर्डे मुडाणा, नरेंद्र जाधव वनोली, जयश्री चव्हाण भोसा, गजानन बुडाल हिंगणी, इंदल राठोड बेलदरी, सौ शितल भिसे फुलसावंगी, दिनेश कदम राहुल, शेख युसुफ वाकोडी, तातेराव वानखेडे करंजी, देविदास बुरकुले दगथर, सौ गायत्री शिंदे वरवडी, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सरपंच संघटने च्या अध्यक्षपदी सरपंच अमोल शाहाणू चिकणे तर उपाध्यक्षपदी सरपंच सौ जयश्री सुनील राठोड यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2021
Rating:
