सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२४ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा ता. पांढरकवडा येथील कृषिदुत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु . वैभव विठ्ठलराव गुरणुले या विद्यार्थ्याने कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन पिक पाहणी कशी करायची या बद्दल उत्तम महादेव भोयर (पो.पाटील) पिवरडोल थेट यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले.
पेरवे भरते वेळी 7-12, आणि गाव नमुना आठ जवळ बाळगावे तसेच चालू मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा, शेतात जाऊनच नोंदणी करावी, कमी नेटवर्क असेल तिथून नोंदणी करू नये, पिकाचा फोटो घेताना लोकेशन चालू करावे इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
यावेळी तलाठी श्री खैरे साहेब, उपसरपंच मोहन गुरनुले तसेच पो.पाटील उत्तम भोयर, शंकर वाडगुरे, अविनाश शेंडे, यादव ठाकरे, विष्णू वाढई, संदीप गुरनुले व समस्त गावकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय कोंघारा चे प्राचार्य श्री राठोड सर तसेच कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री भाकडे सर व कीटक शास्त्र विभागाचे प्रमुख श्री वानखडे सर तसेच माने मॅडम, दत्ता जाधव सर, अजय सोलंकी सर, इंझालकर मॅडम, शिरपूर्कर सर व आत्राम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृषी दुताने केले ई- पिक पाहणी प्रात्यक्षिक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 25, 2021
Rating:
