सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५सप्टें.) : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदूबाबा मठ नगरीत गेल्या सात आठ वर्षांपासून झोपडपट्टी वासीय आपल्या कुटुंबाना घेऊन वास्तव्य करीत आहे एव्हढेच नाही तर हाताला मिळेल ते काम करुन ते आपल्या परिवारांचा उदारनिर्वाह करीत आहे अश्यातच या परिसरात त्यांनी आपल्याला राहण्यांसाठी ब-याच वर्षा पासून झाेपड्या उभारल्या आहे . मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन या गरीब कुटुंबधारकांना आज पावेताे विज, पाणी, हक्कांची गृहनोंद, व निवाऱ्यांच्या सोयी उपलब्ध करुन देण्यांस सातत्याने टाळाटाळ करीत आहे.
भारतीय संविधानात अशा तांडा वस्तीचा, झोपडपट्टी वस्तीचा विकास करुन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तजवीज केली आहे.हे तेव्हढेच खरे आहे. परंतु दुर्गापूर ग्रामपंचायतच्या मनमानी व हेकेखाेर कारभारामुळे येथील झोपडपट्टीत वास्तव्य करणारे कुटुंब जंगली जनावरांच्या दहशतीत अनेक सुविधेच्या अभावात जिवन कंठीत आहेत. अनेक वर्षांपासून राजकीय मंडळी या ठिकाणी केवळ मतापुरते आपले राजकारण करीत आले आहेत. या हलाखीच्या जिवन जगणां-याला न्याय कुठे मिळेल व कुणाकडून मिळेल या विवंचनेत ते असताना त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई य़ांची त्यांनी भेट घेतली. व त्यांचे माध्यमांतुन ऑल इंडिया पँथर सेना यांच्या कडे त्यांनी आपल्या समस्या मांडल्या या झोपडपट्टी वासीयांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने उभी राहिल याची ग्वाही देत त्यांची काल याच संदर्भात एक महत्वपुर्ण बैठक झाली.
या बैठकीला उपस्थित ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, युवा पँथर निशाल मेश्राम, भैय्याजी मानकर व नागरिक उपस्थित होते. लवकर (ग्राम पंचायत दुर्गापूर) बेजबाबदार प्रशासना विरोधात पँथरचे डरकाळी आंदोलन उभे करण्यांत येणार असल्याचे रुपेश निमसरकार यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.
ग्रा.प. दुर्गापूर विराेधात लवकरच डरकाळी आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 25, 2021
Rating:
