सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (०५ सप्टें.) : पुनर्वसन स्थळी प्लॉट किंवा प्लॉटची योग्य किमंत मिळावी म्हणून मागणी, न मागणी झाल्यास पोळ्या च्या नंतर आमरण उपोषणाची नक्की तयारी असल्याचे गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पैनगंगा वेकोली प्रकल्पाच्या अरेरावी व हेकेखोर धोरणाला कंटाळून गावकऱ्यांनी राजुरा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदन सादर करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तोडींही पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर (गाडेगाव) तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर या प्रकल्पाच्या विरोधात तक्रार केली आहे.
सविस्तर असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर (गाडेगाव) यांनी येथील गावकऱ्यांना न विस्तृत विश्वासात न घेता गावत डोजर लावून घर पाडून बेघर केले. या अनुषंगाने गावकऱ्यांनी या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात कोरपना तहसीलदार यांना निवेदन देऊन, गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांची तक्रार, न गुन्हा दाखल न झाल्यास न्यालायात जाण्याची तक्रारदाराची तयारी आहे.
दरम्यान पोळा झाल्यावर तक्रारदार उपोषणाला बसण्याची इच्छा पूर्णपणे पसरल्याचे सह्याद्री न्युज ला निवेदन देऊन कळविले आहे. पैनगंगा वेकोली च्या संदर्भात चक्क कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन देत पैनगंगा वेकोली च्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार विरूर (गाडेगाव) ग्रामस्थ आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर खाडे, रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस गौतम धोटे, साहेबराव घुग्गूल, आणि तसेच सामाजिक कार्यकर्ता काँग्रेसचे उत्तमराव पेचे साहेबांच्या सह ग्रामस्थानी मागणी व तक्रार केली आहे.
या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांनी सदर विरूर गावातील पात्रातून अवैध कोळसा उत्खनन, सुरू केले ते या पैनगंगा वेकोली अधिकारी यांनी थांबवावे. नाही तर गावकऱ्यांना मोबदला जागा द्यावी. नाही तर खाली जाग्याचे तिन लाख रूपये देण्यासाठी रास्त मागणी विरूर गावातील (५२) गावकरी न्याय हक्काची
मागणी धरून आहेत.
याद्वारे वेळोवेळी निवेदन व प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने यावर प्रकाश टाकण्यात आला मात्र, या पैनगंगा प्रकल्प अधिकारी यांनी विरूर गावकऱ्यांच्या संदर्भात कसलीही कार्यवाही न झाल्याची माहिती गावकरी अन्याय सहन करते मारोती पिंपळकर, रविदास करमणकर, किर्तीदास करमणकर, सुधाकर केळझरकर, विक्रंम ताजने आणि समस्त खाली प्लॉट धारक मौजा विरूर गाडेगाव यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी. दोषींविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम-नियम-उपनियम व अटी नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाही व्हावी अशी लेखी तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यालायात दाद मागण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, असे विरूरवाशिय म्हणतात.
यांच्या या आरोप व तक्रारीमुळे कोरपना तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या तक्रारीविषयी पोलीस व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पैनगंगा वेकोली प्रकल्पाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी यांच्या कडे गावकऱ्यांनी केली तक्रार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
