सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (०५ सप्टें.) : नागरिकांना कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. शेतीचे कामे चालू झाली आणि पावसामुळे गावातील रस्ते चिखलमय झाले. गेल्या काही दिवसांपासून वरोरा तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास चिखल तुडवा लागत आहे.
वरोरा तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी बोर्डा या गावातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहे. रस्ते चिखलमय होत असल्याने ग्रामवासियांना चिखलातून येर-जाऱ्या माराव्या लागतात तशी वेळ आली आहे. पावसाळ्यात रहदारी करावी लागते, बाहेर जाण्याकरिता खडीकरणाचा पक्का रस्ता असावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बोर्डा येथील रस्त्यांची दयनीय अवस्था
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
