सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (०५ सप्टें.) : अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही विविध माध्यमातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे. एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे.
त्याचाच एक भाग आज पोळा सन, या दिवशीला पळसाच्या देटाने बैलाचे खांदे मळवतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील लोकं पळसाचे मेळे आणतात, बडगा च्या दिवशी सकाळी आपल्या दरवाजाला लावतात. मात्र, हे मेळ्यासाठी मोठे झाड न तोडता लहान फांदी आणून आपला सन साजरा करावा असे प्रगतिशील शेतकरी व उद्योजक रामहारी पाटील आडकीने यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना सांगितले.
शासनाने 'झाडे लावा झाडे जगवा' हे धोरण अवलंबले असुन, लाखो रुपये खर्च केले जातात. जिवनात एकही झाड आपण लावत नाहीत. मात्र, झाडे तोडण्याचा आपल्याला आधिकार कोणी दिला ? हा प्रश्न स्वतः ला विचारला जावं. वृक्ष संवर्धन करण्यासाठी वन विभागाने जन जागृती करणे आवश्यक आहे. तर तरूण मंडळी ने समोर येऊन किमान एक तरी झाड लावायला पुढाकार घ्यायला हवाच. असे मत पोळा सना निमित्त आडकीने यांनी बोलुन दाखवले आहे.
वृक्ष संवर्धन व त्याबाबत वन विभागाने जन जागृती करावी - रामहरी आडकीने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
