रंगनाथ स्वामी पोलिस चौकी जवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०८ सप्टें.) : शहरातील दीपक चौपाटी परिसरातील रंगनाथ स्वामी पोलिस चौकी जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. इसमाचे नाव व त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही कळू शकले नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी पोहचायचे आहेत. पोलिस तपासातच सदर व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण उघडकीस येईल.

वणी शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून अती मद्य सेवनामुळे झिंग चढल्याने रात्रभर पावसात भिझल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाजही परिसरातील नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे. सकाळी रस्त्याने फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना सदर इसम मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली. पण अद्याप कुणालाही मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
रंगनाथ स्वामी पोलिस चौकी जवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह रंगनाथ स्वामी पोलिस चौकी जवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह Reviewed by सह्याद्री चौफेर on September 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.