सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (०८ सप्टें.) : मारेगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात ही टायफाईड मलेरिया डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असून, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत सचिवांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या की, आपल्या ग्रामपंचायत ला फॉगिंग फवारणी करून घ्या, दुर्लक्ष करू नका. या सूचनेला काही ग्रामपंचायत ने प्रतिसाद देत आपल्या ग्रामपंचायत ला फॉगिंग फवारणी करून घेतली आहे. मात्र, मच्छिन्द्रा येथील ग्रामपंचायत ने अजूनही फॉगिंग फवारणी केली नाही. गट ग्रामपंचायत मधील मच्छिन्द्रा, बामर्डा व फेफरवाडा गाव परिसरात रोगराई चे वातावरण असून मलेरिया टायफाईड डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे फॉगिंग फवारणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
मच्छिन्द्रा येथील नागरिकांनी विधी अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांच्याशी रोगराई व फवारणी बाबत चर्चा केली असता त्यांनी प्रशासक म्हसे यांना थेट संपर्क साधून येथील गट ग्रामपंचायत ला फॉगिंग करा अशी मागणी केली. आर्थिक नियोजन करून ४ ते ५ दिवसात फॉगिंग करू असे प्रशासकाकडून सांगण्यात आले. परंतु दिवस लोटूनही येथील गावात अद्याप फॉगिंग फवारणी केली नसल्याने रुग्णासह नागरिक रोगराई ने त्रस्त होत आहे. पावसाळा सुरु आहे त्यामुळे ग्रामीण भागाकडे गांभीर्याने लक्ष देणे लागतेय मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने गाफिल न राहता उपाय योजनासह योग्य नियोजन करून गावागावात आपली आरोग्य यंत्रणा तयार ठेवून सध्या मच्छरांचे वाढलेले प्रमाण, ग्राम स्वच्छता, व रोगराई कमी कसे करता येईल यासाठी फॉगिंग फवारणी करणे हाच एक प्राथमिक उपाय आहे असे, मत सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी 'सह्याद्री न्यूज' ला बोलतांना सांगितले आहे.
मच्छिन्द्रा येथील ग्रामस्थ फॉगिंग फवारणीच्या प्रतीक्षेत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 08, 2021
Rating:
