सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (०७ सप्टें.) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम अभिसर फाउंडेशनच्या ऊर्जा दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा वाकड पुणे येथे आज साजरी करण्यात आली.प्रतिमापूजन सौ राणी ताई विजय मुसुडगे उपसरपंच श्री क्षेत्र देहुगाव व श्री. मिलिंद संपतराव शेलार सर अध्यक्ष पुणे जिल्हा कला शिक्षक संघ पुणे खजिनदार रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या हस्ते झाले. यावेळी देहू गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जाई नीलेश मोरे, अभिसर फाऊंडेशनचे संचालक सौ. कल्पना मोहिते, सौ. डांगे मॅडम व श्री. रमेश मुसुडगे, श्री. विजय मुसुडगे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी गोपी व ऋषिकेश यश यांनी मदत केली व कार्यक्रमाची कल्पना श्रीयुत अभिजीत तांबे यांनी सुचवली.
अभिसर फाउंडेशन तर्फे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 07, 2021
Rating:
